ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी देखील आरोपी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तसंत त्यांना यांनी आठ दिवसात पोलिसांसमोर हजर व्हावे, असा आदेशही दिला होता. याआधी पुणे न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ds kulkarni son shirish kulkarni surrenders police
First published on: 25-06-2018 at 19:56 IST