21 October 2020

News Flash

डीटीएड् परीक्षेमधील कॉपी; २१ भावी गुरूजी निलंबित

डीटीएड् अभ्यासक्रमाच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉपी करत असताना दोन परीक्षा केंद्रांवरील तब्बल २१ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसा अहवाल आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला.

| June 14, 2014 01:55 am

डीटीएड् अभ्यासक्रमाच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉपी करत असताना दोन परीक्षा केंद्रांवरील तब्बल २१ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसा अहवाल आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला.
शहरातील व्यंकटराव परगे अध्यापक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत इंग्रजी विषयाची परीक्षा होती. साडेचारशे विद्यार्थी ही परीक्षा देत होते. बहुतेकांकडे कॉप्या होत्या. मात्र, पथक आल्याचे लक्षात आल्यानंतर खिडकीतून अनेकांनी कॉप्या बाहेर टाकल्या. परीक्षेत १० विद्यार्थी गाइडची पाने फाडून नकला करीत असताना पथकाच्या निदर्शनास आले. पथकाचे प्रमुख भारत सातपुते, उपशिक्षणाधिकारी शोभा येणूरकर, विस्तार अधिकारी एस. डी. बिराजदार यांनी ही कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईचा अहवाल पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना पाठवण्यात आला. या परीक्षा केंद्रावरील पूर्वी नियुक्त केलेल्या केंद्र संचालकांऐवजी अचानक दुसरा केंद्र संचालक नियुक्त होता. या परीक्षा केंद्रावर गरप्रकार होत असल्याची माहिती वरिष्ठांकडून पथकाला कळवण्यात आली व पथकाने तातडीने कारवाई केली.
दरम्यान, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे व शिक्षण उपनिरीक्षक के. आर. िशदे यांनी या परीक्षा केंद्राला भेट देऊन केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांना न तपासता परीक्षा हॉलमध्ये पाठवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या परीक्षा केंद्रावर पोलिसांचे पथक नव्हते. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याला विनंती करूनही त्यांनी पथक पाठवले नसल्याचे निदर्शनास आले.
गैरप्रकारातही समाजविद्वेष?
उदगीर येथील विद्यावíधनी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर तब्बल ११ विद्यार्थी कॉपी करीत असताना उपशिक्षणाधिकारी एन. आय. शेख यांच्या पथकाने पकडले. या केंद्रावर एका अधिकाऱ्याचे ‘कुलदीपक’ परीक्षा देत होते. मात्र, हा अधिकारी एका समाजाचा असून केवळ दुसऱ्या समाजाच्या मुलांच्या कॉप्याच पकडत आहे व आपल्या समाजबांधवांना मात्र व्यवस्थित सोडून देत आहे, असा आरोपही त्याच्यावर करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:55 am

Web Title: dted exam copy 21 future teachers suspended
Next Stories
1 जि.प. शिक्षण विभागामधील कामचुकार १४ जणांना नोटीस!
2 अण्णा हजारे यांचा वाढदिवस स्नेहालयमध्ये उद्या विविध कार्यक्रम
3 वटपौर्णिमेचे औचित्य प्रत्येक गावात वटवृक्षाचे रोपण
Just Now!
X