01 March 2021

News Flash

यवतमाळमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू, ४ जण जखमी

सोलापूर जिल्ह्यातही वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील चिंचोली (न) आज दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.

मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

पाऊस आल्याने झाडाखाली थांबलेल्यांवर वीज कोसळल्यामुळे चार जण ठार तर चौघे जखमी झाले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारात घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारात आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. त्यावेळी तेथून जात असलेल्या काही ग्रामस्थांनी पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा घेतला. पण दुर्दैवाने ते सर्वजण ज्या झाडाखाली उभे होते, तिथेच वीज कोसळली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातही वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील चिंचोली (न) आज दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला . शेतात काम करत असताना अलाउद्दीन दस्तगीर बेनुरे (वय ५२) हे शेतकरी जागीच ठार झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 6:33 pm

Web Title: due to power lightning in yavatmal 4 dead 4 injured
Next Stories
1 सांगलीतील प्रेमी युगुलाची महाबळेश्वरमध्ये आत्महत्या
2 आता पुढचे सुवर्णपदक २०२०च्या ऑलम्पिकमध्ये : तेजस्विनी सावंत
3 औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या
Just Now!
X