News Flash

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यासह १०० गावांचा संपर्क तुटला!

पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसर संपर्काच्या बाहेर झाला आहे. पावसामुळे भामरागडच्या बसस्थानक चौकापर्यंत पुराचे पाणी शिरले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने रहदारी बंद झाली आहे. मुसळधार पावासामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास  १०० गावांचा संपर्क तुटला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात भामरागड तालुक्याचा संपर्क तुटतो. यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र दिनी भामरागडचा जगाशी संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा संपर्क तुटला आहे. या नदीच्या पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने बाजारपेठ, बसस्थानक परिसरात पाणी आहे. काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

या पुरामुळे डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा देखील संपर्क देखील तुटला आहे. या भागात अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील मोठे गाव लाहेरीचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे नुकतेच पर्लकोटा नदीवरील पुलासाठी ८० कोटींचा निधी या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केला होता. हा उंच पूल झाला तरच या भागाला दरवर्षी भेडसावणारा हा प्रश्न कायम निकाली निघणार आहे.तेव्हा पुलाचे काम तात्काळ सुरू करा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 9:05 am

Web Title: due to torrential rains 100 villages including bhamragad taluka out off range msr 87
टॅग : Heavy Rain
Next Stories
1 विरोधकांनी बिळात न बसता पीपीई कीट घालून करोना वॉर्डात जाऊन यावं : हसन मुश्रीफ
2 अलिबागमध्ये घरगुती गणपतींचे विसर्जन यंदा नगरपालिकेकडून
3 “पालकमंत्री बदलणे पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखे नाही”
Just Now!
X