News Flash

सिंधुदुर्गात डंपर मालकांचे आंदोलन

आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महसुल आणि पोलीस यंत्रणेविरोधात डंपर मालक चालकांनी सिंधुनगरी येथे छेडलेले आंदोलन चिघळले आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जाण्यासाठी आवारातील गेट तोडण्यात आली, तसेच पोलीसावर दगडफेकदेखील करण्यात आल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर्सवर महसुल आणि पोलीस यंत्रणेकडून होणारी कारवाई तसेच आर्थिक छळवणूकीमुळे डंपर मालकचालक संतापले होते. जिल्हाधिकारी यांनी चीरा, वाळु, काळादगड वाहतूक करणाऱ्या डंपरना अव्वाच्या सव्वा दंड आकारून आर्थिक कोंडीत आणले होते.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या या अरेरावीमुळे डंपर मालकचालकांनी डंपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून चाव्या जिल्हाधिकारी  यांच्या स्वाधीन करणारे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला काँग्रेसचे आम. निलेश राणे, शिवसेना जिल्हा प्रमुख आम. वैभव नाईक, भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी पाठींबा दर्शविला. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंतदेखील आंदोलकांसोबत होते.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्गनगरी येथील हायवेवर सुमारे पाचशेपेक्षा जास्त डंपर उभे करून आंदोलन केले जात होते. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. पालकमंत्री दीपक केसरकर आंदोलनाला जबाबदार असल्याचे काँग्रेसने आरोपदेखील केले. आज दुपारी मुंबई-गोवा हायवेची वाहतूकही काही काळ रोखली गेली. मात्र पोलिसांनी तातडीने दक्षता घेऊन वाहतूक सुरळीत केली.

जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या विरोधात काँग्रेसच्या तीव्र भावना होत्या. त्यातच भाजपाचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनीदेखील जिल्हाधिकारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महसुलमंत्री एकनाथ खडसे यांना लवचिक धोरण स्विकारा असे आदेश देऊनही यांची उचलबांगडी करण्याचे सुतोवाच केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनीदेखील प्रशासनाने डंपर चालक मालकांची चालविलेली आर्थिक छळवणुकीविरोधात नाराजी व्यक्त केली. शांततेत आंदोलन करून यंत्रणेकडून न्याय मिळवूया असे आम. वैभव नाईक म्हणाले होते.

या डंपर मालकांच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी ढुंकूनही पाहिले नसल्याने संध्याकाळी आम. निलेश राणे आंदोलन स्थळी दाखल झाले.

यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवाराच्या प्रवेशद्वाराची गेट तोडून पोलिसांवर दगडफेक करताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. डंपर व्यावसायीकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. रॅपीड कॅक्शन फोर्सने लाठीचार्ज केला. त्याचा प्रसाद काही डंपर व्यावसायिक व पत्रकारांना मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2016 2:37 am

Web Title: dumper owners movement in sindhudurg
टॅग : Sindhudurg
Next Stories
1 को.ए.सो.माणकुळे शाळेला १ लाख १ हजार रुपयांचा निधी
2 रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट
3 भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यपदी महेश मोहिते
Just Now!
X