पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून युजर्सकडे पैसे मागितल्याचा प्रकार नुकताच घडला होता. याप्रकरणी त्यांनी अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करत बनावट फेसबुक आणि आर्थिक फसवणूकीपासून सावध राहा अस म्हटलं होतं. या घटनेला पाच दिवस उलटून गेले असून पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून युजर्स, मित्रांकडे पैसे मागितल्याचे प्रकरण पुन्हा समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांना कोणी आव्हान देत आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं गेल्या आठवड्यात फेसबुकवरील प्रोफाइल फोटोचा वापर करून बनावट अकाउंट तयार करण्यात आलं होतं. त्यावरून त्यांच्या मित्रांकडे आणि इतर फेसबुक युजर्सकडे दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. हे समजल्यानंतर याप्रकरणी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अधिकृत फेसबुक पेजवर बनावट अकाउंटवरून पैसे मागितल्याचा फोटो आणि मजकूर पोस्ट केला होता. तसंच त्यांनी अशा बनावट फेसबुक अकाउंटपासून आणि आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा असं म्हटलं होतं. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली होती.

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण

या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाचा फेसबुक प्रोफाइल फोटो, नाव वापरून अज्ञात व्यक्तीने बनावट अकाउंट तयार केले. त्यांच्या अनेक मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, त्यानंतर फेसबुकच्या मेसेंजरवर पैशांची मागणी केली. काही मित्रांनी फोन करून कशाला पैसे हवेत असं त्या पोलीस उपनिरीक्षकाला विचारलं. तेव्हा झालेला प्रकार पोलीस उपनिरीक्षकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तातडीने अधिकृत फेसबुकवर पोस्ट करून संबंधित घटनेची माहिती युर्जसना दिली आणि आर्थिक फसवणुकीपासून इतरांना रोखलं. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.