करोनाच्या टाळेबंदीने शहरात सर्वत्र संचारबंदी असताना दोन मादी अस्वलांनी शहरात मुक्त संचार केला. वीज केंद्रालगतच्या जंगलातून ही अस्वलं शहरात दाखल झाले. टाळेबंदीमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प सध्या बंद आहे. तसेच शहरालगतच्या जंगलात सुध्दा शांतता आहे. अशातच आज शनिवारी पहाटेच्या सुमारास वीज केंद्रालगतच्या जंगलातून दोन हा जंगली प्राणी चंद्रपूर शहरात दाखल झाला.
शहरातील प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, हनुमान मंदिर, रामनगर, बस स्थानक, निर्मल भोजनालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मुल मार्ग, बंगाली कॅम्प या भागात या अस्वलांनी मुक्त संचार केला. शहरात अस्वल संचार करीत असल्याची माहिती चंद्रपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक सोनवणे याना देण्यात आली.
त्यानंतर सोनवणे एक वन पथक आणि इको प्रो या स्वयंसेवी संस्थेच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अथक परिश्रमानंतर बंगाली कॅम्प परीसरात सीएचएल हॉस्पिटलजवळ एक अस्वल जेरबंद करण्यात आलं. त्यानंतर दुसरं अस्वल बस स्थानक परिसरात निर्मल भोजनालय लगतच्या झुडपात दिसून आले. या अस्वलाला देखील जेरबंद करण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरु आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2020 4:08 pm