लॉकडाउन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये शाळांना सुटी देण्यात आली आहे. शिक्षक आवश्यक खबरदारी घेऊन ई-लर्निंग, उत्तरपत्रिकांची तपासणी, निकालपत्र आणि संबंधित कामकाज करीत आहेत. अशातच शिक्षकांनी जिल्ह्यातील अनेक शाळांच्या भिंती विविध चित्रांच्या माध्यमातून बोलक्या केलेल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेन्द्र लोखंडे तसेच शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रामुळे शाळेतील, परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या बोलक्या भिंतीतून ज्ञान मिळणार आहेच परंतू, गावातील नागरिकांना देखील मार्गदर्शनाचा एक भाग झालेला आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

चिंचाळाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने लॉकडाउनमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. मे आणि जून महिन्यात शाळा आकर्षक आणि भिंती बोलक्या करण्याचे काम या शाळेने केलेले आहे. ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार’, ‘रेल्वे‘ ही संकल्पना भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून रंगविण्यात आली. यातून भविष्यातील संकटे, संधी, संस्कृती आणि मानव समाज परस्परव्यवहार या घटकांवर चित्रे काढण्यात आली. उर्वरित रंगरंगोटी करताना मुख्य तीन क्षेत्रे जसे जमीन, पाणी आणि अवकाश यांची निवड करण्यात आली.

या शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे त्या सर्वांच्या उपयोगाची आणि प्रत्येक घटकातून ज्ञान घेता येणारी चित्रे रंगांमध्ये रेखाटण्यात आली. ग्रामगीतेतील शिक्षण विषयक ओव्या रेखाटून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे चरित्र घडविण्यास मदत होणार आहे. स्मार्टफार्म या चित्र रेखाटनातून भविष्यातील एज्युकेटेड स्मार्ट शेतकरी दर्शविण्यात आला तर जलचित्रांमध्ये समुद्राशी संबंधित माहिती दर्शविण्यात आली. अवकाश क्षेत्रातील सूर्यमाला, अवकाश संबंधित वाहने, यान, क्षेपणास्त्रे तर जमीन क्षेत्राचा विचार करताना निसर्ग सौंदर्य, भूभाग, पाणी जीवन, ग्रामीण जीवन, शेती, वाळवंट, दुष्काळ हे सर्व घटक चित्रकाराच्या कुंचल्यातून आणि मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून पूर्ण करण्यात आले आहे.

सावली तालुक्यातील करगाव केंद्र पाथरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी देखील लॉकडाउनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याकरिता व विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून शाळेच्या भिंतींवर चित्र रेखाटलेले आहे. यामध्ये महापुरुषांची जीवनपट दर्शक माहिती, स्वच्छतेचे संदेश, पर्यावरण विषयक माहिती, व्यसनमुक्ती, जलसंवर्धनाबाबत चित्र, पक्षी, प्राणी यांची माहिती, नकाशे, आपलं गाव व परिसराचे थ्रीडी चित्र, गणितीय संकल्पना व संवाद ऋतुचक्र व सूर्यमाला, दिनचर्या इंग्रजी विषयी चित्रे शाळेच्या भिंतीवर काढलेली आहेत. तसेच स्वच्छतागृह व किचनशेडचे चित्राद्वारे सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामुळे शाळा सुंदर व आकर्षक झाल्यामुळे शालेय परिसरात प्रवेश करताच मन मोहून टाकते.