कोल्हापुरात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील यांना सडेतोड उत्तर दिल्याने प्रसिद्धीझोतात आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांना गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी सुरज गुरव यांना गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलं आहे. सुरज गुरव यांनी एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो असं सांगत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना बाणेदारपणे उत्तर दिलं होतं. यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या १०१ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलं आहे. यामधील एक नाव सुरज गुरव यांचं आहे.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

काय झालं होतं ?
कोल्हापूर महापालिका महापौर निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यामुळे सत्ताधारी गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी डोळ्यात तेल घालून सत्ता राखण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यासाठी दोन्ही आमदार महापालिका हद्दीत आले होते. पण , महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नव्हता.त्यामुळे बंदोबस्तावर असलेले सुरज गुरव यांनी आमदारद्वयीला महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्याला मुश्रीफ यांनी विरोध केला. त्यातून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात बाचाबाची होत असल्याचे पाहायला मिळाले.

सूरज गुरव यांनी बाणेदारपणे त्यांना सांगितले की ”एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे’. सूरज गुरव यांनी दबावासमोर न येता स्पष्ट वक्तेपणाची रोखठोक भूमिका घेतल्याने त्याची चर्चा आणि कौतुक सगळीकडे झालं होतं.