देशातील पहिला ई-ऑफिस कार्यप्रणाली उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राबविला जात असून, येत्या २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ  होणार आहे. देशात सिंधुदुर्ग व नांदेड या दोन जिल्ह्य़ांत प्रथमत: ई-ऑफिस कार्यप्रणाली राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ई-ऑफिस कार्यप्रणालीमुळे प्रशासकीय यंत्रणा पेपरलेस होणार आहे.  सर्व कार्यालयात  संगणक, लॅपटॉप उपलब्ध करण्यात आले आहेत तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही  देण्यात आले. त्यानंतर आता ई-ऑफिस कार्यप्रणालीस प्रारंभ होणार आहे. ई-ऑफिस कार्यप्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. ई-ऑफिस कार्यप्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह सारी यंत्रणा ई-ऑफिस कार्यप्रणालीच्या जय्यत तयारीत गुंतली आहे. मुख्यमंत्री ना. चव्हाण यांचा दौरा निश्चित झाल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.