25 November 2017

News Flash

सिंधुदुर्ग नूतन जिल्हाधिकारीपदी ई. रवींद्रन

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन यांची सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून शासनाने

वार्ताहर, सावंतवाडी | Updated: July 7, 2013 3:18 AM

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन यांची सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी जातपडताळणी समितीचे तसेच माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे.
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी झाली आहे. सिंधुदुर्गात ई ऑफिस व ई-मोबाईलप्रणाली राबवून मुख्यमंत्र्याचे लक्ष सिंह यांनी वेधले होते.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन यांच्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी झालेल्या नियुक्तीचे स्वागत तर मावळते जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांना निरोप देण्यात आला.
गझलकार म्हणून प्रसिद्ध असणारे दिलीप पांढरपट्टे यापूर्वी सिंधुदुर्गात प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी होते. सध्या ते जात पडताळणी विभागात होते. त्यांची सिंधुदुर्गचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असल्याने ते पुन्हा सिंधुदुर्गात आले आहेत.
जिल्हा परिषद बदल्यांबाबत मावळते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पी. ए.वर बदलीची कारवाई करून चर्चेचा विषय बनविला होता.

First Published on July 7, 2013 3:18 am

Web Title: e ravindran sindhudurgas new district collector