News Flash

पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता

आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले

Earthquake tremors felt in Palghar 3-7 Richter scale intensity
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली (संग्रहित छायाचित्र)

आज महाराष्ट्रातील पालघर शहरात भूकंपाचे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले. ३.७ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

यापुर्वी मे महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा- भूकंप आणि घरे

पालघर परिसरातील भागामध्ये हा सौम्य धक्का जाणवला. यामुळे कोणतीही हानी किंवा धोका निर्माण झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 1:56 pm

Web Title: earthquake tremors felt in palghar 3 7 richter scale intensity srk 94
टॅग : Earthquake
Next Stories
1 अजित पवार म्हणाले, ‘रंग नाही आवडला’; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस’
2 “कमजोर, विस्कळीत पडलेल्या विरोधी पक्षाचा अवतार पाहूनच मोदींना आत्मविश्वास”; शिवसेनेने मांडलं स्पष्ट मत
3 सांगलीतील ३३ रुग्णालयातील कोविड रुग्णसेवा बंद