‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांचा संयुक्त उपक्रम

सांस्कृतिक वातावरणामुळे  महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत महत्त्वाचे स्थान आहे. राज्यात सण-उत्सवांना सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्व असले तरी सामाजिक भावनाही त्यातून जपली जाते. या संदर्भात महत्त्वाचे पाऊल म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आग्रह. याला बळ मिळावे, पर्यावरणरक्षणाचा ध्यास तळागाळापर्यंत पोहोचावा म्हणून पर्यावरणरक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीही ‘पर्यावरणस्नेही घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०१८’ आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
adequate blood supply across maharashtra
यंदाच्या उन्हाळयात राज्यभर पुरेसा रक्तसाठा 
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागात घेण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या पर्यावरणाला घातक वस्तूंच्या वापराचे दुष्परिणाम आता सगळ्यांनाच कळू लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना भाविकांमध्ये रुजत चालली आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून घरगुती गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ९९९९ रुपयांचे व द्वितीय पारितोषिक ६६६६ रुपयांचे आहे. तर विशेष पारितोषिक २००१ रुपयांचे आहे. रोख रकमेबरोबरच विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

दीड ते अकरा दिवसांचा घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेत भाग घेता येईल. ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयांमध्ये बुधवार, २२ सप्टेंबपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करता येईल. यावेळी आरास करण्याकरिता वापरलेले साहित्य, छायाचित्रे, संपर्क, पत्ता आदी माहिती स्वीकारली जाईल. छायाचित्र व माहिती टपाल, कुरिअरच्या माध्यमातून किंवा  loksatta.ecoganesha@gmail.com या ई-मेलवर पाठवता येईल. मुदतीनंतर आलेल्या छायाचित्रांचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक, थर्माकोलचा वापर नसावा. छायाचित्रात गणेशमूर्ती, मखर आणि सजावट स्पष्ट दिसावी. त्यासाठी छायाचित्रे (वेगवेगळ्या कोनातून काढलेली) काढून पाठवायची आहेत. मूर्ती व सजावटीची तीन छायाचित्रे पाच बाय सात आकाराची व रंगीत असावी. प्रत्येक छायाचित्राच्या सोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल, वापरलेल्या साहित्याची यादी जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • मुंबई – लोकसत्ता, सातवा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, दूरध्वनी- ६७४४०३६९.
  • ठाणे – लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, दूरध्वनी-२५३९९६०७.
  • नाशिक – वंदन चंद्रात्रे, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड, भ्रमणध्वनी क्रमांक-९४२२२४५०६५.
  • पुणे – अमोल गाडगीळ, दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि., एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्रमांक १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, भ्रमणध्वनी ९८८१२५६०८२
  • औरंगाबाद – मुकुंद कानिटकर, १०३ गोमटेश मार्केट, न्यू गुलमंडी रोड, औरंगाबाद- ४३१००१, दूरध्वनी क्रमांक ०२४०/२३४६३०३.
  • अहमदनगर – संतोष बडवे, पहिला मजला, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर-४१४००१, भ्रमणध्वनी-०९९२२४००९८१.
  • नागपूर – गजानन बोबडे, वितरण विभाग,फ्लॉट नं. ३८, ऑडिसन ट्रेड सेंटर, पहिला मजला, डागा लेआऊट, अंबाझरी, नागपूर भ्रमणध्वनी झ्र् ९८२२७२८६०३