News Flash

‘ईडी’ दणका, नागपूरमध्ये ४८३ कोटींचा मॉल जप्त

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा (पीएमएलए) या कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.  

मंगळवारी नागपूरमधील ४८३ कोटी रुपयांचा व दोन लाख ७० हजार ३७४ चौरस फूटांचा शॉपिंग मॉलच जप्त केला (छायाचित्र: धनंजय)

अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नागपूरमधील केएसएल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची मालकी असलेल्या इम्प्रेस मॉलवर जप्तीची कारवाई केली आहे. या मॉलची किंमत सुमारे ४८३ कोटी रुपये इतकी असून आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा (पीएमएलए) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकेची फसवणूक केल्यांसदर्भात केएसएल अँड इंडस्ट्रीजवर कारवाई करताना अमलबजावणी संचालनालयाने  मंगळवारी नागपूरमधील ४८३ कोटी रुपयांचा व दोन लाख ७० हजार ३७४ चौरस फूटांचा शॉपिंग मॉलच जप्त केला.  मुंबईतील तायल ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकीची ही कंपनी आहे. तायल समूहाच्या तीन कंपन्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या तक्रारींची दखल घेत सक्तवसुली संचालनालयानं कारवाई सुरू केली. अॅक्टिफ कॉर्पोरेशन लि., जयभारत टेक्सटाइल्स अँड रीयल इस्टेट लि, व एस्के नीट (इंडिया) लि अशी या कंपन्यांची नावे असून बँक ऑफ इंडिया व आंध्र बँकेकडून २००८ मध्ये ५२४ कोटींची कर्जे घेतली व बँकांना फसवलं असा आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 4:24 pm

Web Title: ed attaches properties empress mall worth rs 483 crore in bank fraud case nagpur
Next Stories
1 वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला आठवडभराची मुदतवाढ
2 कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
3 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ‘ब्लॉक’, जाणून घ्या वेळापत्रक
Just Now!
X