News Flash

शरद पवारांवर गुन्हा : पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता, पोलीस चौकीतील गॅलरीमधून आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली

शिखर बँक घोटळयाप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचे पडसाद आज पुण्यात देखील उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले मंडई चौकात रास्ता रोको करून सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदविला.

शरद पवारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती काल सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियाच्या माध्यमातुन राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर आज राज्यभरातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचे पडसाद पुण्यात देखील उमटले असून महात्मा फुले मंडई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदवला. रास्ता रोको करणार्‍या कार्यकर्त्यांना महात्मा फुले मंडई पोलिसांनी ताब्यात घेतले असता, पोलीस चौकीतील गॅलरीमधून आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही कारवाई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा स्वाती पोकळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रवक्ते अंकुश काकडे तसेच आजी माजी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 1:37 pm

Web Title: ed fir against sharad pawar protest in pune sas 89
Next Stories
1 25 हजार कोटींचा घोटाळा झालेली बँक तीनशे कोटींचा नफा कशी कमावते : अजित पवार
2 फादर दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध; साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन
3 ‘आपला गडी लय भारी’, रोहित पवार यांची सरकारवर टीका
Just Now!
X