कोल्हापूरमधील बांधकाम व्यवसायिक,सराफ व्यापारी, इचलकरंजी येथील माजी नगरसेवक,जयसिंगपूरमधील नामवंत डॉक्टर अशा चौघांच्या घर, कार्यालयावर ईडीने (सक्तवसुली संचलनालय) छापे टाकले आहेत. या चौघांकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या संशयावरून हे छापे पडल्याची चर्चा आहे. याबाबत पथकाने कमालीची गोपनियता बाळगली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून इचलकरंजीत वेगवेगळे उद्योग करून एका माजी नगरसेवकांने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात करही चुकवले असल्याची जोरदार चर्चा होती. तेथीलच एक बडा सराफ व्यावसायिकानेही आपले जाळे पसरले आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याने मोठया प्रमाणात मालमत्ता जमा केली आहे. जयसिंगपूर परिसरातील नामवंत डॉक्टरही दोन वर्षापासून प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होता.

house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
traffic congestion will affect industries in metros in future says union minister rajeev chandrasekhar
पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात बहुमजली इमारती बांधून गेल्या दहा ते पंधरा वर्षात नाव कमावलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाचे नाव जिल्ह्यात प्रामुख्याने घेतल जाते सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. मात्र बांधकाम व्यावसायातून त्यांनी कोटयवधीची माया जमा केल्याचे समजते. या चौघांच्या नावाची यादी सक्त वसुली संचनालयास मिळाली होती. त्यामुळे रात्री ईडीची चार पथके कोल्हापुरात दाखल झाली.

या पथकांनी माजीनगरेसवक, डॉक्टर व, सराफ व बांधकाम व्यवसाईकाचे घर, कार्यालय व साईटवर भेट देऊन मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. मात्र याबद्दल कमालीची गोपनियता बाळगली जात आहे. आणखी एक दोन दिवस हे पथक कोल्हापुरात थांबून या चौघांच्या मालमत्तेची चौकशी करणार आहेत. बेहिशेबी मालमत्ता आढळली तर संबंधीतांकडे त्याचे जाब जबाब विचारले जाणार आहेत. गरज भासली तर हे पथक संबंधितांना ताब्यात घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.