आवक वाढल्याचा परिणाम; किंमत प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी कमी

पुणे : गेले वर्षभर खाद्यतेलांच्या भडकलेल्या दरवाढीची झळ सामान्यांना बसली होती. खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत आवक वाढत असल्याने खाद्यतेलांच्या दरात घट झाली आहे.

करोनाचा संसर्ग गेल्या वर्षी वाढीस लागल्याने जागतिक बाजारपेठेतून होणारी खाद्यतेलांची आवक कमी होत गेली. त्यामुळे भारतासह (पान २ वर) (पान १ वरून) जगभरातील बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांचा तुटवडा जाणवत होता. परिणामी खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत होती.  सध्या खाद्यतेलांची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. मात्र, यापुढील काळात खाद्यतेलांच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता नाही. खाद्यतेलांचे दर यापुढील काळात टिकून राहतील, असे पुणे मार्केट यार्डातील खाद्यतेलांचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.

pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

किरकोळ तसेच घाऊक बाजारात खाद्यतेलांना मागणी चांगली आहे. शेंगदाणा तेलाचे दर गेल्या काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यात मोठय़ा प्रमाणावर होते. सूर्यफूल, पाम तेलाचे उत्पादन राज्यात केले जाते, असेही त्यांनी नमूद केले.

घसरण किती?

किरकोळ बाजारात एक किलो तेल पिशवीच्या दरात १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात १५ किलो तेलडब्याच्या दरात २०० ते २५० रुपयांची घट झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आयात किती?

जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असलेल्या भारतात दरवर्षांला दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. आपल्या देशाची गरज २२५ लाख टन आहे. भारतात ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होती.

थोडी माहिती..

महाराष्ट्रात शेंगदाणा तेलाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. इंडोनेशिया, मलेशिया, रशिया, स्वित्र्झलड या देशांतून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आयात होते. करोनामुळे परदेशातून होणारी तेलांची आवक थांबली होती. त्यामुळे दरवाढ झाली होती. देशाची खाद्यतेलांची गरज वाढती आहे. त्यामुळे परदेशातील आयातीवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते.

खाद्यतेल डब्याचे दर (१५ किलो डबा)

खाद्यतेल       मागील  आठवडय़ातील     या  आठवडय़ातील

सूर्यफूल   ”            २,५००                       ” २,२५०

पाम    ”               २,२०० ”                       १,९००

सोयाबीन ”           २,४००                        ” २,१००

शेंगदाणा ”          २,७००                          ” २,६००