राज्यातील शिक्षण संस्थांची वाटचाल उद्योगाच्या दिशेने सुरू असून, या संस्थांकडे पसे कमावण्याचे साधन म्हणूनच पाहिले जात आहे. काही अपवाद वगळल्यास संस्थांच्या माध्यमातून पसे कमावणे, हेच मुख्य उद्दिष्ट झाल्याचे भयावह चित्र असल्याचे मत अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष प्रा. गणपतराव उगले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
अखिल भारतीय सत्यशोधन समाजाचे येथे ३७वे अधिवेशन उद्या (शनिवारी) व रविवारी होत आहे. या पाश्र्वभूमीवर प्रा.उगले यांनी, शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणास कसे सामोरे जायचे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. समाजातील आíथक विषमतेमधील अंतर कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय-महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. ज्ञान-विज्ञानवादी भूमिकेतून अभ्यासक्रम तयार झाले पाहिजेत. सत्यशोधक दृष्टिकोनातून अभ्यासक्रम तयार व्हावा.
महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधन समाजाचा खरा आधारस्तंभ शेतकरी व कष्टकरी समाज आहे. सध्या वीज, पाणी, रस्ते आणि शेतीमालास हमीभाव हे शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न आहेत. मात्र, या बाबी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. शेतात अहोरात्र राबूनही घामाचा दाम मिळत नाही. शेतीतील खर्च निघत नाही. विजेचे भारनियमन हा मोठा प्रश्न आहे, त्यावर धोरण ठरायला हवे, असेही उगले म्हणाले.
महात्मा फुले यांनी दिलेल्या ब्यू िपट्रप्रमाणे काम केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. हमीभावाची मागणी महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांच्या आसूड’ या पुस्तकात सर्वप्रथम केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, पण शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना मात्र अधिक सुलभ पसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.