राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून थोडक्यात बचावल्या असून, सुखरुप आहेत. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला आज (१० जुलै) भरधाव टेम्पोनं पाठीमागून धडक दिली. वर्षा गायकवाड यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाबरोबरच हिंगोलीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. हिंगोलीच्या दिशेनं जात असतानाच हा अपघात झाला. मात्र, याबाबत वर्षा गायकवाड यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या पालकमंत्री असून, त्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यावर असतानाच त्यांच्या कारला टेम्पोनं मागच्या बाजूनं धडक दिल्याची माहिती समोर आली. या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूनं नुकसान झालं. सुदैवानं या अपघातात वर्षा गायकवाड यांच्यासह कुणालाही दुखापत झाली नाही.

Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
ajit pawar
फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला अजितदादांचा बूस्ट

ऑक्सिजन प्रकल्पाच्या निमित्ताने राजीव सातव यांच्या कार्याला दिला उजाळा

हिंगोलीत वाढत्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे स्व. नेते राजीव सातव यांच्या कार्याला उजाळा दिला. “करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन क्षमतेत वाढ करणे आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी माझे बंधू स्वर्गीय राजीवजी सातव यांनी अतोनात प्रयत्न केले होते. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्यावर आमचा भर आहे. आणखी पाच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. राजीवजी यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देऊ,” असं वर्षा गायकवाड यांवेळी म्हणाल्या.

वर्षा गायकवाड दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी विविध विषय आणि प्रश्नांसंदर्भात बैठकाही घेतल्या. हिंगोली जिल्ह्यात खेळाडूंच्या सोयीसाठी नव्याने जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. या दौऱ्यात पालकमत्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्याचबरोबर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी निघाल्या असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला.