News Flash

…तर कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा विचार: विनोद तावडे

विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक लवकरच घेऊ

शिक्षण मंत्री विनोद तावडे

शैक्षणिकदृष्ट्या कोकणात स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता असेल तर राज्य सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करेल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ हवे, याबाबत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले. कोकणातील विद्यार्थ्यांना प्रत्येक कामासाठी मुंबईत विद्यापीठ मुख्यालयात यावे लागू नये यासाठी विविध प्रशासकीय प्रक्रिया ऑनलाईन केल्या आहेत. जगात मुंबई विद्यापीठाचे स्थान विचारात घेता कोकणातील विद्यार्थ्यांना या विद्यापीठापासून वेगळे होणे कितपत योग्य आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक लवकरच घेऊ, असेही त्यांनी सांगितले. कोकणासाठी अस्मिता म्हणून नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्या कोकणात स्वतंत्र विद्यापीठ हवे असल्यास याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 4:42 pm

Web Title: education minister vinod tawde on konkan university demand in vidhan parishad
Next Stories
1 भीमा कोरेगावप्रकरणी गुन्हे मागे का घेतले?: माजी पोलीस आयुक्तांची सरकारवर टीका
2 बिल्डरकडे २० कोटींची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक
3 ‘भोजनभाऊ’ जमवून सोनिया गांधी भाजपास रोखू शकतील?-शिवसेना
Just Now!
X