25 September 2020

News Flash

साताऱ्यात शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना १० हजारांची लाच घेताना पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

( संग्रहीत छायाचित्र )

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार शिक्षकाला फरकाचे बिल मंजूर करायचे होते. यासाठी ते शिक्षक पुनिता गुरव यांना भेटले. संबंधित कामासाठी गुरव यांनी त्‍यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाच मागितली. यामुळे तक्रारदार शिक्षकाने एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी सोमवारी संध्याकाळी सापळा रचला आणि दहा हजार रूपयांची लाच घेताना गुरुव यांना रंगेहाथ पकडले.याबाबत पुनिता गुरव यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या वरील गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2018 10:32 pm

Web Title: education officer punita gurav was caught taking bribe of 10 thousand rupees by acb
Next Stories
1 बीडचे राष्ट्रवादीचे नेते पक्ष संपवतील, पंकजा मुंडे यांचा टोला
2 दुसऱ्या पत्नीला दिलासा नाहीच, मुंबईतील कोर्टाचा निर्णय
3 पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीला दे धक्का! रमेश कराड यांचा अर्ज मागे
Just Now!
X