News Flash

पुणे -सोलापूर महामार्गावर तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

तीन ते चार जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती

(संग्रहित छायाचित्र)

पुणे -सोलापूर महामार्गावर काल रात्री घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे तीन अपघात घडले असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास हे अपघात घडले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांसह चालकाची बेफीकीरी अपघातास कारणीभूत असल्याचं समोर येत आहे. महामार्गावरील वाखीरी येथे पायी चाललेल्या एक व्यक्तीस अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दौंड तालुक्यातील कासुर्डा येथे रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरात धडक बसल्याने कारमधील पाचही जणांचा मृत्यू झाला. तिसरा अपघातही दौड तालुक्यात झाला. येथील सहजपूर येथे या ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात कंटनेरचे चाक अडकून कंटनेर उलटले व या कंटनेरला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार धडकल्या. यामध्ये एकाचा जागीच तर अन्य एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 11:24 am

Web Title: eight killed in three accidents on pune solapur highway msr 87 svk 88
Next Stories
1 स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम’; कृषि विधेयकावरील शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपानं ठेवलं बोट
2 “बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते”
3 रायगड जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात घट
Just Now!
X