06 December 2019

News Flash

मोकाट कुत्र्याच्या चाव्यानंतर आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

कुत्र्यांनी आठ महिन्यांच्या बालकाला चावा घेतल्याची घटना बुधवारी प्रवरानगर येथील नेहे वस्ती येथे घडली.

(संग्रहित छायाचित्र)

राहाता :  मोकाट कुत्र्यांनी आठ महिन्यांच्या बालकाला चावा घेतल्याची घटना बुधवारी प्रवरानगर येथील नेहे वस्ती येथे घडली. दरम्यान, उपचार घेत असताना या बालकाचा आज अंत झाला आहे.

तालुक्यातील प्रवरानगर (लोहगाव) येथील नेहे वस्तीवर राहणाऱ्या जावेद शेख यांचा आठ महिन्यांचा मुलगा साहिल जावेद शेख झोळीत झोपेत असताना मोकाट कुत्र्यांनी बालकाला चावा घेतल्याची घटना बुधवार (दि. १७) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली होती. या आधी तीन दिवसांपूर्वी घोगरे वस्ती येथे मुस्कान कौसर शेख या दीड  वर्षांच्या मुलीचा पिकात खेळत असताना मोकाट कुत्र्यांच्या हल्लय़ात करुण अंत झाला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा ही दुसरी घटना घडल्यामुळे प्रवरानगर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. या मुलाला लगेचच प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार करून अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न  केला. परंतु यश आले नाही आणि त्याचा गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास  अंत झाला असून यानंतर या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी प्रवरानगर येथील अमरधामामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अशा प्रकारे गेल्या दोन ते चार दिवसांत दोन चिमुकल्या मुलांचे बळी गेल्यामुळे या परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

First Published on April 19, 2019 12:51 am

Web Title: eight months boy killed in stray dog attack
Just Now!
X