मनमाड-मालेगाव राज्य महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री टेम्पो, मारूती व्हॅन आणि ट्रक अशा तिहेरी अपघातात ८ जण ठार झाले तर ९ जण गंभीर जखमी झाले.
चोंढी घाटाच्याजवळ कुंदलगाव शिवारानजीक हा अपघात झाला. ट्रक मालेगावकडे जात असताना त्यामागे मारूती व्हॅन येत होती. याचवेळी समोरून येणारा टेम्पो ट्रकवर आदळला. पाठीमागून येणारी मारूती व्हॅन ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या तयारीत होती. त्यामुळे मारूती व्हॅनही या दोन वाहनांच्या अपघातात सापडली.
मारूती व्हॅनमध्ये अजमेर दर्गा यात्रेवरून येणाऱ्या मालेगावच्या तांबोळी कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.
अपघातातील मृतांची नावे –
अतिक रमजान तांबोळी – वय ३५ – मनमाड
नाज अतिक तांबोळी – वय १४ – मनमाड
आरिफ महंम्मद फारुक – वय ४० – मालेगाव
अब्दुल कुत्तुस महंम्मद शामी – वय ५० – मालेगाव
सायना निसार तांबोळी – वय ८ – मनमाड
प्रशांत सुरेश खैरनार (महाजन) चालक – मालेगाव
हसीना रशिद तांबोळी – वय ६० – कोळपेवाडी ता.कोपरगाव
विशाल गणेश शेटे – वय ३६ – धुळे