नागपुरातील रामटेक तालुक्यात असलेल्या आसोली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ज्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. नागपुरातील रामटेक आणि मौदा तालुक्यात गुरूवारी चांगलाच पाऊस झाला. त्यावेळी असोली या ठिकाणी वीज कोसळली. शाळेच्या छताचं आणि इमारतीचं प्लास्टर पडल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. नयन कडबे आणि तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. इतर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. मात्र या दोघांना त्यानंतर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

महाराष्ट्रात काल बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. कोकणातही चांगला पाऊस पडतो आहे. याशिवाय मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणीही पावसाच्या सरी गुरूवारी रात्रीपासून कोसळत आहेत. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ठाणे, मुलुंड, डोंबिवली, बदलापूर भागातही चांगलाच पाऊस झाला. दरम्यान नागपुरातल्या रामटेक तालुक्यात असलेल्या आसोली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी झाले. आठपैकी दोन विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.