News Flash

देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा निशाणा

लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' पुस्तक लिहिणार

विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा सवाल खडसे यांनी केला असून, लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जीवनावरील सुनील नेवे लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी एकदा फडणवीस यांच्याविषयीची नाराजी बोलून दाखवली. “सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही,” अशी खंत व्यक्त खडसे म्हणाले, “आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो. पक्षाच्या विरोधात कधीही बोलणार नाही. आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे,” अशा शब्दात खडसे यांनी टीका केली.

याच कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा केली. “लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार आहे. त्यातून अनेक गोष्टी उघड करणार आहे. दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झाले होते. हा इतिहासाशी मिळता जुळता कार्यक्रम आहे. मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमाने लिहिलं आहे. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचं आहे. दाऊदच्या बायकोवरुन सोबत आरोप केले. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली जाते. आता सगळे पुरावे मला मिळाले आहेत. नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. त्यात सगळे मी लिहिणार आहे,” असं खडसे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 3:13 pm

Web Title: eknath khadse attacks on devendra fadnavis bmh 90
Next Stories
1 बेरोजगारी, अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था या गोष्टी कंगनापेक्षा अधिक महत्त्वाच्या : अमोल कोल्हे
2 ठरलं! संभाजी बिडीचं नाव अखेर बदलण्याचा निर्णय
3 एकदा चुकल्यास आम्ही आपल्याला इशारा देऊ, पण…; काँग्रेस नेत्यानं कंगनाला दिली समज
Just Now!
X