25 May 2020

News Flash

कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

Eknath khadse : आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

गेल्या दोन वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकरी शेतात अपार कष्ट घेतो. मात्र, निसर्गाच्या अनियमित चक्रामुळे आणि कधी कधी व्यवस्थेतील त्रुटींमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. अशा वेळी शेतकऱ्याला केवळ कर्जमाफी न देता त्याला कर्जमुक्तीकडे नेण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सध्या पावसाने ओढ दिली असून दुबार पेरणीचे संकट डोक्यावर आहे. अशा वेळी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि ९० टक्के शेतकऱ्यांचे सातबारा कोरा करणारा कर्जमाफीचा हा धाडसी निर्णय असल्याची प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर आ. खडसे यांनी येथे सविस्तर मत मांडले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे सरकारचे धोरण आहे. कर्जमाफी आणि कर्जमुक्तीत मोठा फरक आहे. कर्जमाफी ही शेतकऱ्यांमधील केवळ विशिष्ट घटकांना किंवा आर्थिक मर्यादा निश्चित करून देता येते. परंतु कर्जमुक्तीसाठी सर्वच शेतकरी घटकांचा विचार करावा लागतो. हा मुद्दा आपण कृषिमंत्री असताना स्पष्ट केला होता. त्याचप्रमाणे या वेळी राज्य सरकारने सधन शेतकरी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करून कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. याचा लाभ जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांना मिळेल. विरोधक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करीत होते. या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. त्यामुळे ही कर्जमाफी देशातली सर्वात मोठी व सर्वच शेतकऱ्यांना लाभ देणारी आहे. शिवाय, सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ द्यायचे ठरविले आहे. हा निर्णय म्हणूनच महत्त्वाचा आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांच्या बँक खात्यात २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे. कर्जमाफी जाहीर करताना राज्य सरकारने घटक पक्षांच्या प्रमुखांसह विरोधी पक्षांचे नेते व शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. हा पायंडासुद्धा या निर्णयाची व्यापकता दर्शवतो असेही खडसे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2017 2:33 am

Web Title: eknath khadse comment on 34 thousand crore loan waiver to maharashtra farmers
Next Stories
1 कोकणात पायाभूत सुविधांची कामे सुरू – मुख्यमंत्री
2 नेवाळीत दीड हजारावर आंदोलकांवर गुन्हे
3 राज्यावर खरिपाच्या दुबार पेरणीचे संकट
Just Now!
X