25 February 2021

News Flash

एकनाथ खडसेंपाठोपाठ मुलीचाही भाजपाला रामराम, निर्धार व्यक्त करत म्हणाल्या…

"विधानसभा निवडणुकीत आपला पराभव करण्याचा प्रयत्न झाला"

फोटो सौजन्य - फेसबुक

एकनाथ खडसे यांनी भाजपामधून सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान एकनाथ खडसेंपाठोपाठ त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

“मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे,” असा निर्धार रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे. “विधानसभा निवडणुकीत आपला पराभव करण्याचा प्रयत्न झाला. याचे पुरावे देऊनही कोणती कारवाई करण्यात आली नाही,” असा आरोप रोहिणी खडसे यांनी भाजपावर केला आहे.

आणखी वाचा- भाजपा सोडण्यासाठी तुमच्यावर दबाव?; खडसेंच्या निर्णयावर सून रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया

रक्षा खडसे भाजपातच राहणार –
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असले तरी खासदार असणाऱ्या त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे मात्र भाजपातच राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना खडसेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

“आजचा दिवस अत्यंत दुखाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे,” असं त्या म्हणाल्या. भाजपामधून तुम्हीही बाहेर पडणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी भाजपाकडून निवडून आली आहे. लोकांनी मला भाजपा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. मी पक्षाचं काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार. नाथाभाऊंनीदेखील ४० वर्ष पक्षात घालवली. पण व्यक्तिगत कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला”.

आणखी वाचा- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ती मागणी केली असती तर राजकीय संन्यास घेतला असता : खडसे

“पक्षाने दिलं हे त्यांनीही मान्य केलं आहे. पक्षासोबत त्यांचंही योगदान आहे. जेव्हा आपण व्यक्ती म्हणून काम करतो तेव्हा योगदान महत्त्वाचं असतं. नाथाभाऊंनी कधीही माझ्यावर मी सांगेन तसं करायचं असा दबाव टाकला नाही. त्यांनी संस्कार, शिकवण दिली. जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आणि तीच सेवा आज भाजपाच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणताहाी दबाव नाही,” असं रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 5:20 pm

Web Title: eknath khadse daughter rohini khadse resign from bjp sgy 87
Next Stories
1 येत्या तीन तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता – IMD
2 कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा; बच्चू कडू यांचा अजब सल्ला
3 उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल
Just Now!
X