रायगड जिल्ह्य़ातील पडम येथील काही लोकांनी न्यायालयात धाव घेतल्याने मध्य रेल्वेने घरे पाडण्याची प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
पडम ग्रामस्थांनी १९६२ ते १९७८ पर्यंत घरे बांधली. ही घरे जुनी असून गावठाण जमीन एकत्रिकरणाच्या चुकीमुळे वनखात्याच्या नावे करण्यात आली. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने ही बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. याबाबतचा प्रश्न  सुनील तटकरे यांनी विचारला होता.