साडेसाती दूर करण्यासाठी साकडे
मंत्रीपदावरून पायउतार झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेली साडेसाती दूर व्हावी म्हणून त्यांनी श्रावण महिन्यातील तिसऱ्या शनिवारचे औचित्य साधून शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे येऊन शनिदेवाला सपत्नीक अभिषेक केला.
मंत्रिपद नसले म्हणजे लोक कशी पाठ फिरवतात, याचा अनुभव खडसे यांना आला. मंत्री असताना जिल्ह्यातील अनेक नेते खडसे यांच्या दौऱ्यात सहभागी होणाऱ्यांनी शनिवारी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरविली. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे सहभागी झाले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात खडसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रशीद इनामदार यांनी भाजपात प्रवेश केला. सचिन देसरडा, नितीन दिनकर, नवनीत सुरपुरीया, बापूसाहेब शेटे, प्रकाश शेटे, सयाराम बानकर आदी यावेळी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2016 1:21 am