कोयनाकाठचे शेतकरी व राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या आपल्या गावात आगमन होताच कोयनाकाठच्या या परिसराला अक्षरश मिनी मंत्रालयाचे स्वरूप आले आहे. मंत्रिपदाची झूल बाजूला सारून शिंदे यांनी आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत गावात स्वतःच्या शिवारात फेरफटका मारून शेतीत कामही केले.

दरे तर्फ तांब गावचे ग्रामदैवत उत्तरेश्वर यात्रेनिमित्त एकनाथ शिंदे हे गावी आले आहेत. आज दिवसभर त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची रीघ लागली होती. यातूनही  शिंदे यांनी वेळ काढून आपल्या वडिलांसह शेतीची पाहणी केली. त्यांनी बांधलेल्या शेततळ्याची पाहणी केली, तसेच या शेततळे व बंधाऱ्यालागत वृक्षारोपण केले. बंधाऱ्यात साठलेले पाणी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बंधाऱ्याच्या काठावर झाडे आल्यास हा परिसर आणखी दिमाखदार होणार असल्याचे सांगितले.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तरेश्वर येथील यात्रेनिमित्त उत्तरेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी जाणार आहेत. रविवारी दरे ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी व भागाच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे यांचा गावचे ग्रामदैवत जननीदेवी मंदिरात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्या वेळी भारत गोगावले, वाई महाबळेश्वर खंडाळाचे आमदार मकरंद पाटील व जिल्ह्यातील अनेक जेष्ठ नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मंत्री शिंदे कुटुंबीयांसह गावी मुक्कामी आल्याने कोयना विभाग फुलून गेला आहे. राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी,शिवसेना कार्यकर्ते,पदाधिकारी, शासकीय अधिकारी शिंदे यांच्या भेटीला आले होते.