News Flash

कोकण विभाग शिक्षक मतदार संघ

निवडणूक तक्रार निवारण कक्ष स्थापन

निवडणूक तक्रार निवारण कक्ष स्थापन

महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील सदस्यांची जागा रिक्त झाल्याने सदर जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने प्रस्ताविकेतील अ.क्र. २ अन्वये दिनांक ४ जानेवारी २०१७ ते ९ फेब्रुवारी २०१७ पर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषीत केलेला आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण कक्ष Complaint Monitoring Cell) (CMC) स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (निवडणूक शाखा) येथे तक्रार निवारण कक्ष  (Complaint Monitoring Cell) (CMC) स्थापन करण्यात येत आहे. सदर कक्षाचा संपर्क क्रमांक ०२३६२-२२८८५४ असा असून ईमेल आयडी dydeosindhudurg@gmail.com असा आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.

जिल्हा नियोजन समितीची सभेबाबत निवेदन

सावंतवाडी : गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०१७ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेली जिल्हा नियोजन समितीची सभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आदर्श आचारसंहितेमुळे होऊ शकणार नाही. जिल्हा नियोजन समितीच्या पुढील सभेची तारीख व वेळ अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने यथावकाश कळविण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 12:25 am

Web Title: election complaints redressal in konkan
Next Stories
1 भिकाऱ्याला मारहाण करणारा रेल्वे पोलीस अखेर निलंबित
2 ‘सखे-सोबती’ दूर जाणार!
3 मुंबईतील मराठा मोर्चाची तारीख बदलली; ३१ जानेवारीऐवजी ६ मार्चला मोर्चाचे आयोजन
Just Now!
X