निवडणूकीत पराभव होणार याची कल्पना आली होती, कारण आपलीच माणसे विरोधात काम करत होती. पण माझं नशीब चांगलं की अनामत रक्कम(डिपॉझिट) जप्त झाले नाही अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.
सोलापूरमध्ये पत्रकारपरिषद घेऊन सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवाला पक्षातील मंडळीच जबाबदार असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “आपल्याच लोकांकडून घात होणार याची कल्पना होती त्यामुळेच निवडणुकीच्या काळात मी स्वत: सर्व सुत्रे हाती घेऊन सोलापूरात ठाण मांडून होतो. पण जे व्हायचं ते झालच.”
माझा पराभव हा जनादेश आहे आणि तो स्वीकारायला हवा तसेच काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी जबाबदार नाहीत असेही शिंदे म्हणाले. त्याचबरोबर यापुढे राजकारणात सक्रीय राहणार नसून केवळ पक्षाची सेवा करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.