News Flash

निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

महाड येथे निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश भिसे (वय ३०) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पोलादपूर तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता.

| October 16, 2014 04:23 am

महाड येथे निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश भिसे (वय ३०) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पोलादपूर तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता. आज सकाळी निवडणूक कामकाजासाठी महाड प्रांताधिकारी कार्यालयात येत असतांना, वाटेतच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान मृत योगेश भिसे याच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत मिळावी यासाठीचा प्रस्ताव राज्याच्या निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
  महाड विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. आज ते खास बसेसने गुजरातहून मोठय़ा संख्येने महाडमध्ये दाखल झाले होते. सुरत, बडोदा, कल्याण, ठाणे, वसई, दादर, लालबाग, जळगाव, िपपरी चिंचवड, सातारा या ठिकाणाहून सर्व पक्षांचे मतदार १५० हून अधिक बसेसने महाड परिसरात दाखल झाले होते. मतदान सुरू असताना ८ मशीन्स बंद पडल्या होत्या. रायगड – माणगाव तालुक्यातील तळेगाव येथे मतदान करून परतणाऱ्या महिलेचा बसच्या धडकेने मृत्यू झाला. सरिता सीताराम धामणे असे मृत महिलेचे नाव आहे
रायगड जिल्ह्यात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झालेल मतदान
*अलिबाग विधानसभा मतदारसंघ ७२ टक्के
*कर्जत विधानसभा मतदारसंघ ७३ टक्के,
*पनवेल विधानसभा मतदारसंघ ६७ टक्के,
*उरण विधानसभा मतदारसंघ ७२ टक्के,
*पेण विधानसभा मतदारसंघ ६७ टक्के,
*श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ ६० टक्के
*महाड विधानसभा मतदारसंघ ७० टक्के

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 4:23 am

Web Title: election duty employee dies by stroke in mahad
Next Stories
1 सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ६५ टक्के मतदान
2 कोल्हापूर जिल्ह्यातील ८० टक्के मतदान
3 सांगली जिल्ह्य़ात मतदानासाठी चुरशीच्या लढतींमुळे उत्साह
Just Now!
X