सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते म्हणून संजय आंग्रे यांची काँग्रेस पक्ष निरीक्षक गुलाबराव घोरपडे यांनी निवड केली असतानाच कणकवलीत खासदार नारायण राणे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांची निवड केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकीय वातावरणात गरमागरम चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास सावंत यांनी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर विजयी झालेल्या २६ सदस्यांची बैठक बोलावली होती. गटनेते व सदस्य सतीश सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर ही बैठक बोलावली होती. मात्र २३ जिल्हा परिषद सदस्य खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत उपस्थित राहिले तर काँग्रेस बठकीत तीन सदस्य उपस्थित होते. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या २६ सदस्यांनी येत्या दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता आरपीडी हायस्कूलमध्ये उपस्थित राहावे, या वेळी जिल्हा परिषद गटनेता निवड केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास सावंत यांनी दिली या बठकीला अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ते अपात्र ठरू शकतात असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या २६ सदस्यांना बठकीत निमंत्रित करण्यासाठी पक्षप्रतोद म्हणून संजय आंग्रे यांची आज निवड केली असल्याचे विकास सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या सव्वीस सदस्यांची बैठक बोलावली होती. या वेळी संजय आंग्रे, राजलक्ष्मी डिचवलकर, स्वरूपा विखाळे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे गटनेते व सदस्य सतीश सावंत यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे जिल्हा परिषद काँग्रेस सदस्यांचा गटनेता निवडण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती असे विकास सावंत म्हणाले. सर्व सदस्यांना व्हॉट्सअ‍ॅप आणि जाहीर नोटीसद्वारे आजच्या बठकीचे निमंत्रण देण्यात आले होते या वेळी तीन सदस्य उपस्थित राहिले असे सावंत यांनी सांगितले. या वेळी काही जिल्हा परिषद सदस्यांनी बाहेरगावी व आजारी असल्याचे आणि उपस्थितीसाठी पुरेसा वेळ नसल्याचे कारण दिल्याने पुन्हा येत्या दि. २३ नोव्हेंबर रोजी आर पी डी शाळेत पुन्हा बैठक घेतली जाईल ती बैठक पक्षप्रतोद संजय आंग्रे बोलावतील. या वेळी काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बोलावणार आहे असे विकास सावंत म्हणाले. काँग्रेस पक्ष निरीक्षक गुलाबराव घोरपडेंच्या उपस्थितीत बैठक झाली असे सावंत म्हणाले. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे जिल्हा परिषद सदस्य अपात्र ठरले त्याचा हवाला सावंत यांनी दिला. या बठकीत उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर अपात्र कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे निसíगक न्यायमानुसार ७ दिवसांची मुदत देऊन पुन्हा २३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. सर्व सदस्यांना निमंत्रण पोस्टाने पाठवले जाईल असे ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजयी झालेल्या सदस्यांना गट निर्माण करता येत नाही. पक्षाची परवानगी लागते. आता पुन्हा गट निर्माण झाल्यास सदस्य अपात्र ठरू शकतात याची जाणीव सर्वाना करून दिली जाणार आहे. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य अपात्र ठरू नये अशी सर्वाना माहिती दिली जात आहे. त्यानंतर पुढील योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सावंत म्हणाले. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्यांनी कोणा नेत्यांच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून प्रयत्न केला जात आहे असे विकास सावंत यांनी सांगितले. काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेले आमदार नितेश राणे हेदेखील तांत्रिक कारणामुळे अन्य पक्षांच्या व्यासपीठावर होते, तसेच काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या व्यासपीठावर दिसत आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना वेळ देण्यात आला आहे. ते बठकीत उपस्थित राहिले नाहीत, योग्य ती कारवाई करू असे सावंत यांनी सांगितले.