News Flash

दिवाळीत उमेदवारांची ‘आकडेमोड’!

जिल्ह्याच्या चारही मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी आपापल्या विजयासाठी मातब्बर नेतेमंडळींच्या सभांसह कार्यकर्त्यांची मनधरणी केली. या पाठोपाठ आता खर्चाच्या आकडेमोडीत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची मात्र दमछाक होत

| October 18, 2014 01:10 am

जिल्ह्याच्या चारही मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी आपापल्या विजयासाठी मातब्बर नेतेमंडळींच्या सभांसह कार्यकर्त्यांची मनधरणी केली. या पाठोपाठ आता खर्चाच्या आकडेमोडीत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची मात्र दमछाक होत आहे.
उस्मानाबाद व तुळजापूर मतदारसंघातील ३३ उमेदवारांनी १२ ऑक्टोबपर्यंत ६५ लाख ८६ हजार रुपये खर्च नोंदविला. उमरगा व परंडा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च अजून नोंदविलेला नाही. सर्व उमेदवारांना आता एकूण खर्च नोंदविण्यासाठी महिनाभराचा अवधी मिळाला आहे.
उमरगा, परंडा, उस्मानाबाद व तुळजापूर मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मोठा खर्च केला. जिल्ह्याचे राजकीय केंद्र असणाऱ्या तुळजापूरमध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. या सभांसाठी, कार्यकर्त्यांचे चहा-पान, वाहनभाडे, तसेच स्टेशनरी खर्च मोठय़ा प्रमाणात झाला. मात्र, तरीही लाखोंचा हिशेब हजारात आणण्यासाठी उमेदवारांनी विविध मार्गानी नामी शक्कल लढविली आहे.
तुळजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जीवन गोरे यांचा १२ ऑक्टोबपर्यंत ४ हजार ८८ हजार ७९७, काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांचा ७ लाख ५७ हजार २४२, बसपचे प्रेमानंद डोरनाळीकर ११ हजार १७५, मनसेचे देवानंद रोचकरी यांचा ४ लाख १५ हजार २४७, भाजपचे संजय िनबाळकर यांचा ४ लाख ३३ हजार ६५९, शिवसेनेचे सुधीर पाटील यांचा ७ लाख ५५ हजार ५२०, महाराष्ट्र विकास आघाडीचे सतीश कसबे यांचा ३५ हजार ३३७, िहदुस्थान जनता पार्टीचे नागनाथ जवान यांचा २५ हजार ७०० व अपक्ष ५ उमेदवारांचा एकूण ३१ लाख ११ हजार ५५० रुपये खर्च झाला.
उस्मानाबाद मतदारसंघात सेनेचे ओम राजेिनबाळकर यांचा ९ ऑक्टोबपर्यंतचा खर्च ५ लाख १९ हजार ६१५, बसपचे जयराम घुले २ लाख २७ हजार ८४७, भाजपचे संजय पाटील दुधगावकर ७ लाख ९१ हजार ४७४, राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील ७ लाख ८ हजार ६४७, काँग्रेसचे विश्वास िशदे ३ लाख ६९ हजार ३५५, मनसेचे संजयकुमार यादव २ लाख १३ हजार ७४६, एमआयएमचे अकबरखान गुलाबखान पठाण ३ लाख ७३ हजार ४६५ यांच्यासह इतर १३ उमेदवारांचा एकूण खर्च ३४ लाख ७४ हजार ५०८ रुपये झाला.
उमेदवारांचा प्रत्यक्ष व नोंदवलेला खर्च यात मोठी तफावत असून त्याचाही शोध घेतला जात आहे. उमेदवारांना आता निवडणुकीचा एकूण खर्च सादर करण्यास एक महिन्याचा अवधी दिला आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दिवाळीच्या सुट्टीत बसून आकडेमोड व्यवस्थित करण्यास वेळ मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2014 1:10 am

Web Title: election notes
टॅग : Osmanabad
Next Stories
1 नक्षलवाद्यांचा डाव उधळला
2 पावसाळा संपूनही राज्यात ९० गावे-वाडय़ांमध्ये टँकर!
3 वाढलेल्या मतदानाचा लाभ कोणाला?
Just Now!
X