रोकडेश्वर सूतगिरणीच्या निवडणुकीत डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि जयप्रकाश दांडेगावकर या दोघांची कसोटी लागणार आहे. वसमत तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये दोन जयप्रकाश नावांच्या व्यक्तींचा सहभाग असतोच असतो. डॉ. मुंदडा यांनी मंत्रिमंडळात असताना रोकडेश्वर सूतगिरणीची मुहूर्तमेढ रोवली होती. या सूतगिरणीवर आता २९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. सूतगिरणी सुरू असली तरी वेगवेगळ्या गैरकारभारामुळे या सहकारी संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची होईल, असे मानले जात आहे. १४ जून रोजी मतदान होणार आहे.  १७ जागांसाठी निवडणूक मदानात सुमारे ५० उमेदवार उभे आहेत. ३ जून रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. एकूण ६ हजार १७० मतदार संचालक मंडळाची निवड करण्यासाठी मतदान करणार आहेत.
 युती सरकारच्या काळात डॉ. जयप्रकाश मुदंडा सहकार खात्याचे मंत्री असताना वसमत येथे रोकडेश्वरची सूतगिरणी उभी करण्यासाठी सुमारे सव्वाकोटींचे इलेक्ट्रीकल साहित्य खरेदी केले. यासोबतच सूतगिरणीचे इतरही काम केले. परंतु सूत निघण्यापूर्वीच सूतगिरणीतून मोठय़ा प्रमाणात साहित्याची चोरी झाली, जाळपोळीच्या घटना घडल्या आणि सूतगिरणी बंद पडली.
योगायोगाने राज्यात आघाडी शासन आले आणि जयप्रकाश दांडेगावकर यांना सहकार खाते मिळाल्याने त्यांनी रोकडेश्वर उभी करण्यासाठी प्रयत्न केले. सभासद संख्या वाढवून भांडवल उभे केले. शासनाकडून २६ कोटींची मदत मिळविली. तर बँकेकडे २६ कोटी रुपये कर्जाचा प्रस्ताव पाठविला. त्यापकी २२ कोटींचे कर्ज मिळाले आणि २१ हजार चाते (िपडल) चालू केले.  २००७ मध्ये रोकडेश्वरमधून सूत बाहेर पडू लागले. दांडेगावकरच्या प्रयत्नांना यश आले. वसमत तालुक्यात पूर्णा साखर कारखान्याप्रमाणेच रोकडेश्वर सूतगिरणीसुद्धा दिमाखाने चालू लागली.
रोकडेश्वरवर आजमितीला सुमारे २९ कोटींचे बँक कर्ज असून कर्जाची परतफेड करण्याच्या मुद्यावरून काही काळ सूतगिरणी चच्रेत आली. बँकेने कर्जाच्या परतफेडीपोटी रोकडेश्वरला सील ठोकले होते. मात्र दांडेगावकर यांच्या प्रयत्नामुळे आठ ते दहा दिवसांत रोकडेश्वर भाडेतत्त्वावर चालविण्याचे ठरले आणि त्यातूनच बँकेचे सील निघाले. आजमितीला रोकडेश्वरचा प्रवास चालू आहे.
यापूर्वी विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला व योगायोगाने राज्यात परत युतीचे सरकार आले. आज डॉ. मुंदडा यांच्या वाटय़ाला मंत्रिपद मिळाले नसले तरी राज्यात युतीची सत्ता असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. मुंदडा आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून रोकडेश्वर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. तर विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीने रोकडेश्वर आपल्याच गटाच्या ताब्यात राहील यासाठी माजी मंत्री दांडेगावकर हेसुद्धा प्रयत्नात आहेत.
वसमत तालुक्यात सहकार क्षेत्रात दोन जयप्रकाशच्या एकूण वाटचालीचा विचार करता सहकारमंत्री असताना डॉ. मुंदडा यांनी रोकडेश्वर सूतगिरणी तसेच बाराशीव सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या दोन्ही संस्था चालविण्यात त्यांना अपयश आले. या उलट दांडेगावकर यांनी रोकडेश्वरमधून सूत काढून दाखविले. तर बंद पडलेला बाराशीव साखर कारखानासुद्धा पूर्णाच्या माध्यमातून सुरू करून उस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिल्याचा दावा दांडेगावकर समर्थक करतात. त्यामुळे वसमत तालुक्यातील जनता सूतगिरणी कोणाच्या ताब्यात देते, याची उत्सुकता वाढली आहे.

Buldhana lok sabha, Buldhana,
बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!
19 candidates filed nominations for Sangli Lok Sabha elections on the last day
सांगली : अखेरच्या दिवशी १९ जणांची उमेदवारी दाखल
Independent MLA Prakash Awade, Contest Hatkanangle Lok Sabha Seat , CM Eknath Shinde, Prakash Awade Eknath Shinde meet, eknath shinde shivsena, lok sabha 2024, election 2024, politics news,
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही प्रकाश आवाडे लोकसभा लढण्याचा निर्धार कायम; मंगळवारी अर्ज भरणार
Prakash Awade, Lok Sabha, hatkanangle,
आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात; पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली