पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान होत असून या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी गुरुवारी दिली. १४७ मतदान केंद्रावर होत असलेल्या या मतदानासाठी १ लाख ४२ हजार पदवीधर मतदार आणि १० हजार शिक्षक मतदार आपला प्रतिनिधी निवडीसाठी मतदान करणार आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघातून १७ आणि शिक्षक मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. या निवडणुकीनिमित्त उद्या होत असलेल्या मतदानासाठी सांगली जिल्ह्यात १९८ मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. ही सर्व मतदान केंद्रे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आहेत. ज्या शाळांत मतदान केंद्रे आहेत त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे पदवीधर मतदारांसाठी १४७ मतदान केंद्रे असून, शिक्षक मतदारांसाठी ४५ आणि ज्या ठिकाणी पदवीधर व शिक्षक मतदार आहेत त्यांच्यासाठी एकत्रच सोय असलेल्या ६ मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण १९८ मतदान केंद्रांवर पदवीधर व शिक्षक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  प्रत्येक मतदान केंद्रावर मतपत्रिका व मतपेटय़ांसह अधिकारी व कर्मचारी आजच रवाना झाले आहेत.  पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार १२३ पदवीधर मतदार आहेत, तर १० हजार १६ शिक्षक मतदार आहेत.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदानासाठी एकूण १ हजार २०६ अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती केली असून यामध्ये केंद्राध्यक्ष, पहिला मतदान अधिकारी, दुसरा मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी, चौथा मतदान अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि शिपाई यांचा समावेश आहे. तसेच जिल्हयातील १९८ मतदान केंद्रांसाठी ८२ सूक्ष्म निरीक्षकांची, तसेच २८ क्षेत्रीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे तनात केल्याचे ते म्हणाले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होईल. यामध्ये क्रमांकानुसार मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यानुसार उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा आहे. सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतात. पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (1, 2, 3 असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील).  पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा मतपत्रिकेवर करू नयेत.
मतदान पत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वतचा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही.  जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जाईल.  त्याचाच वापर मतदानासाठी करावा.
वरीलपकी कोणताही पर्याय नाही (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असणार आहे.  नोटा किंवा पसंती क्रमाने मत देता येईल, यापकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.  पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार दिनांक २० जून २०१४ रोजी मतदान होत आहे.  त्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मतदार ओळखपत्राचा ओळख पटविण्यासाठी वापर करावयाचा आहे.  मतदान ओळखपत्र नसलेल्या मतदारांनी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पर्यायी १३ ओळखपत्रापकी एक पुरावा सोबत ठेवावा व तो मतदानाच्यावेळी ओळखीसाठी सादर करावा.  निवडणूक आयोगाकडून अनुमती मिळालेले पर्यायी १३ ओळखपत्र पुरावे पुढीलप्रमाणे आहेत. पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), इन्कम टॅक्स आयडेंटिटी (पॅनकार्ड), डिग्री/डिप्लोमा सर्टििफकेटस, छायाचित्रासह सíव्हस आयडेंटिटी कार्ड, छायाचित्रासह बँकेचे पासबुक, प्रॉपर्टी कार्ड, ३१ मे २०१४ पूर्वी देण्यात आलेले रेशन कार्ड, ३१ मे २०१४ पूर्वी सक्षम अधिका-यांचे छायाचित्रासह असणारे जातीचे प्रमाणपत्र, सक्षम अधिका-याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, शस्त्र परवाना, रजिस्टर जनरल आणि सेन्सेस कमिशनर ऑफ इंडिया यांनी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड हे १३ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.