कडेगाव तालुक्यात २०११-१२ मध्ये शेती पंपाच्या वीज जोडणीसाठी पसे भरलेल्या शेतकऱ्यांना एका महिन्यात, तर सन २०१२-१३ मध्ये पसे भरलेल्या शेतकऱ्यांना येत्या ३ महिन्यात देण्याची ग्वाही, विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांनी कडेगाव येथे आयोजित आढावा बठकीत दिली.
पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली काल कडेगाव येथे भारती विद्यापिठाच्या ग्रामीण विकास भवनमध्ये तालुक्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात बठक संपन्न झाली. या बठकीत वरील माहिती देण्यात आली. बठकीस सोनहिरा सहकारी साखर कारखान्यचे चेअरमन मोहनराव कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार , विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता रमेश घोलप,कार्यकारी अभियंता एम.बी. िशदे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पंचायत समिती सभापती आसमा तांबोळी, आदि मान्यवर उपस्थित होते.
कडेगाव तालुक्यात २०११-१२ या वर्षांमध्ये पसे भरलेल्या ७० शेतकऱ्यांना १५ ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक असून  त्यासाठी ११ कि.मी. लांबीची लाईन टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेतलेले आहे. तर, सन- २०१२-१३ मध्ये शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्या ३३८ शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी ७२ ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. एकंदरीत कडेगाव तालुक्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी १४ कोटी ३५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आल्याचेही मुख्य अभियंता रमेश घोलप यांनी सांगितले.
कडेगाव तालुक्यात शिवणी व पाडळी येथे ३३ के.व्ही क्षमतेची वीज उपकेंद्रे उभारण्यास मान्यता मिळाल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले,की बेलवडे येथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्स मंजूर झाला असून हे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करावे, तसेच कडेगाव येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्याची सूचनाही त्यांनी या बठकीत केली. तालुक्यातील ओव्हरलोड शेिडग कमी करण्यासाठी १३५ ट्रॉन्सफॉर्मर्स मंजूर करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. ही सर्व कामे विद्युत वितरण कंपनी स्वतच्या खर्चातून करणार असल्याचे या वेळी मुख्य अभियंत्यानी स्पष्ट केले.
कडेगाव तालुक्यातील विजेच्या समस्या येत्या दोन महिन्यात निकाली काढण्याची सूचना करुन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, की तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबरोबरच जनतेचे अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी विषेश बठका आयोजित केल्या जातील. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न आणि समस्यांची गावपातळीवरच सोडवणूक करण्यासाठी गाव भेटींचा विशेष कार्यक्रम हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली.  
शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्याच्या दर शनिवारी ऊर्जा मित्र बठक घेण्यात यावी, अशी सूचना करुन वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी. तसेच,विजेसंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी त्वरित दूर कराव्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या  अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करुन सामान्य माणसाला न्याय द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. कदम यांनी केले.
 बठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,  गटविकास अधिकारी संतोष जोशी , उपसभापती मोहनराव मोरे,जि.प. सदस्य भीमराव मोहिते, सुरेश मोहिते, अविनाश पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता एम.बी. िशदे, सहायक अभियंता आर. बी. बारिशगे, आदी मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, तालुक्यातील सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि वीज ग्राहक उपस्थित होते.