अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. परंतू आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल.”
आणखी वाचा- ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या मुद्द्यावर विद्यार्थी-पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट
दरम्यान, ऑनलाइन-ऑफलाइन प्रवेश झाले आहेत. तसेच ऑनलाइन अभ्यासाचा लाभ प्रवेश न झालेल्या विद्यार्थांनाही घेता येणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 1:34 pm