सांगलीतील राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकत्रे इलियास नायकवडी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी कार्यकारिणीत व पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केला आहे. पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर नवीन निवडी श्री. तटकरे यांनी आज जाहीर केल्या. श्री. नायकवडी यांना उपाध्यक्षपदाची पुन्हा संधी देण्यात आली असून या पदाबरोबरच अल्पसंख्याक विभाग, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.