ज्यांना स्वतच्या कारखान्यातल्या कामगारांचे पगार करता येत नाहीत किंवा जो कायम दुस-यांना टोप्या घालतो त्यांना जनता त्यांची जागा नक्की दाखवेल. आम्ही जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि उदयनराजेंमुळे सर्वसामान्य कामगार, भूमिपुत्र सुरक्षित आहे, असे प्रतिपादन राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी सारखळ येथे बोलताना केले.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, सरपंच चांगण आदी मान्यवर उपस्थित होते.
राजमाता श्री. छ. कल्पनाराजे पुढे म्हणाल्या, की आम्ही केवळ जनतेचा विचार केला. जनतेचा विश्वास संपादन केला. उदयनराजे भोसले कायम त्यांच्या हक्कासाठी भांडले. पण दुस-यांना टोप्या घालणारे केवळ विश्वासघाताच्या राजकारणाशिवाय काही करु शकले नाहीत, अशी टीका त्यांनी राजेंद्र चोरगे, पांडुरंग शिंदे यांचे नाव न घेता केली.
उदयनराजेंचे नेतृत्व क्रियाशील आहे. त्यांच्या कामावर टीका करणा-यांनी स्वतची उंची तपासावी, मग अर्थशून्य बडबड बंद करावी. उदयनराजेंनी सर्वसामान्यांसाठी जिल्हा रुग्णालयात ट्रॉमा सेंटर उभे केले आहे, डायलेसीस, नवजात अर्भकांसाठी आरोग्यसेवा सुरु केल्या आहेत. सातारा येथे मेडिकल कॉलेज, नìसग कॉलेजची व्यवस्था केली. त्यांनी धरणांच्या कामांसाठी निधी मिळवला. दुष्काळी भागात पाणी पोचावे यासाठी प्रयत्न केले. आज त्याचे चांगले परिणाम दिसतात.
साठ वर्षांत जो विकास झाला नाही तो उदयनराजेंच्याकडून पाच वर्षांत व्हायला पाहिजे ही विरोधकांची अपेक्षा आहे, मात्र जनतेला उदयनराजे यांनी केलेला विकास माहीत आहे. सुमारे ३०० कोटी रुपये त्यांनी आजपर्यंत जिल्ह्य़ातील जनतेसाठी खर्च केले आहेत. यापूर्वी जनतेने खासदार फंडातले एवढे पसे खर्च झाल्याचे पाहिले आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. तुमच्यासारख्या आम आदमीसाठी उदयनराजे झटत आहेत, बाकी सगळे दिशाभूल करत आहेत. त्यावर विश्वास न ठेवता खा. उदयनराजे भोसले यांना विजयी करुन इतिहास घडवा, असे आवाहन त्यांनी केले.