05 March 2021

News Flash

जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो – रामदास आठवले

कोल्हापुरात रामदास आठवले यांचं वक्तव्य

संग्रहीत

कोल्हापूर: मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था बंद करावी. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत.

आगामी जनगणना होत असताना त्यामध्ये जातनिहाय उल्लेख व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत. मराठा समाजाला इतर मागास वर्गीय प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. त्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग करावं. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही. त्यातील उपेक्षित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे ही आमच्या पक्षाचे भूमिका आहे.

शेतकर्‍यांना भडकवण्याचा प्रयत्न
नवा कृषी कायदा हा शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. या कायद्याला विरोध करीत पंजाब आणि हरयाणामधील शेतकर्‍यांना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही संघटना राजकारण म्हणून कायद्याला विरोध करत आहेत. सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकरी संघटनांनी तडजोडीची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 8:59 pm

Web Title: end caste system we leave reservation says ramdas athavale scj 81
Next Stories
1 आजोबांसाठी नातू मैदानात ! पवारांच्या पत्रावरुन टीका करणाऱ्या भाजपाला सडेतोड प्रत्युत्तर
2 महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
3 सेवाभाव, करुणा यामुळेच करोनाविरुद्ध लढा यशस्वी- राज्यपाल कोश्यारी
Just Now!
X