21 September 2020

News Flash

दहावी अनुत्तीर्ण चित्रकाराचे वारली संस्कृतीवर इंग्रजी पुस्तक

जर्मन, फ्रेंच भाषेतील पुस्तकानंतर नवीन पुस्तकाचे आज प्रकाशन

प्रसिद्ध वारली चित्रकार मधुकर वाडू

जर्मन, फ्रेंच भाषेतील पुस्तकानंतर नवीन पुस्तकाचे आज प्रकाशन

नीरज राऊत, पालघर

पालघर तालुक्यातील मनोर कोंढाण येथील प्रसिद्ध वारली चित्रकार मधुकर वाडू यांचे वारली समाजाच्या अभ्यासाविषयीचे आणि वारली चित्रकलेची माहिती देणाऱ्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन बोर्डी येथे होणाऱ्या चिकू महोत्सवात होणार आहे. याआधी वाडू यांची पुस्तके जर्मन आणि फ्रेंच भाषेत प्रकाशित झाली होती.

दहावी अनुत्तीर्ण असलेल्या मधुकर वाडू यांनी जर्मन भाषेचा डिक्सनरीचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांनी २००३ मध्ये ‘अंडर द रेनबो’ हे जर्मन भाषेतील पुस्तक प्रकाशित करून वारली संस्कृतीचा प्रसार केला. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली. गेल्या वर्षी त्यांनी फ्रान्सचा दौरा केला आणि इंग्रजीत लिहिलेल्या साहित्याचा फ्रेंच भाषेत अनुवाद केला. वाडू यांनी आता ‘मिस्टिकल वर्ल्ड ऑफ वारली’ हे इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले असून २ फेब्रुवारी रोजी चिकू महोत्सवात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

१२० पृष्ठे असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ‘नोशन प्रेस’ने केले असून या कामात भारतीय कला व संस्कृतीचा वारसा जपणारी इनटॅच संस्थेच्या फिरोझा टाफ्टी यांचे सहकार्य लाभले आहे.

वारली समाजात असलेल्या जुना प्रथांचा अभ्यास करण्यासाठी मधुकर यांनी पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात तसेच गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांतील ग्रामीण भागांचा दौरा करून गावातील वयोवृद्ध, ज्येष्ठ मंडळींशी संवाद साधला. त्यांची मधुकर वाडू यांनी टिपणे करून संग्रह केला. त्याचबरोबर वेगवेगळ्या आदिवासी चित्रांचे छायाचित्रण केले आहे. हे पुस्तक लिहितान त्याची मदत झाली.

या पुस्तकात काय?

वारली समाजाचा इतिहास, जगाच्या निर्मितीबद्दल त्यांचे विचार, वारली समाजाचे आध्यात्मिक महत्त्व, त्यांच्याकडे असलेले निसर्गाविषयीचे ज्ञान, वारली दंतकथा, वारली नागरिकांची जीवनशैली, त्यांचे रीतिरिवाज, सण-उत्सव, नृत्य, संगीत वाद्य, वारली चित्रकला यांची माहिती या पुस्तकात आहे. या चित्रमय पुस्तकात वारली विचार आणि प्रत्यक्षात आचरणात येणाऱ्या परंपरा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 2:50 am

Web Title: english book on warli culture by x failed artist
Next Stories
1 केंद्र व राज्य सरकारचा निषेध, नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन
2 ‘आणीबाणीतील संघी कार्यकर्त्यांना १० हजार आणि शेतकऱ्याला ५०० रुपये, ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का?’
3 गोपीनाथ मुंडेंच्या हत्येचं प्रकरण समोर येताच पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता – जयंत पाटील
Just Now!
X