24 September 2020

News Flash

वर्धा : वृक्षतोडी विरोधात आज क्रांतिदिनी पर्यावरणप्रेमींनी फुंकला आंदोलनाचा बिगुल

चिपको आंदोलनाचा दिला इशारा

सेवाग्राम विकासाच्या नावावर खुद्द गांधीजींनी लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याबद्दल आज क्रांतिदिनी पर्यावरणप्रेमींनी भर पावसात निषेध व्यक्त करीत चिपको आंदोलनाचा इशारा दिला.

दरम्यान, वृक्ष कत्तल थांबावी म्हणून पालकमंत्री सुनील केदार यांना विनंती केल्यावर त्यांनी बाळगलेले मौन गांधीवाद्यांसाठी आश्चार्याचे ठरत आहे.  सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत कोट्यावधी रूपये खर्चून रस्ते व विकासाची अन्य कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत वर्धा‑सेवाग्राम रस्त्यावरील ७० मोठी झाडे तोडण्यात आली असून रूंदीकरणात आड येणारी १७० झाडे तोडण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच सामाजिक संघटनांनी गत दोन दशकात या मार्गावर जपलेल्या झाडांचाही बळी जाणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, कस्तूरबा व अन्य मान्यवरांनी लावलेली ही झाडे असल्याचा संदर्भ गांधीवादी देत आहे. ज्या महात्मा गांधींनी अतिरेकी विकासाला नाकारात वृक्षांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याच्या दीडशेव्या जयंती महोत्सवाच्या उत्सवासाठी वृक्षांची कत्तल केल्या जाण्याची बाब दुर्देवी असल्याचे मत जेष्ठ गांधीवादी डॅा. उल्हास जाजू यांनी व्यक्त केले. वृक्ष कत्तलीविरोधात निषेधाचे सूर उमटल्यानंतर पालकमंत्री सुनील केदार यांना भेटून पर्यावरणप्रेमींनी झाडे तोडणे थांबविण्याची विनंती केली. मात्र त्याचा अंमल न झाल्याने आज गांधीवादी व पर्यावरणप्रेमींनी सेवाग्राम मार्गावर धन्वंतरी चौकात निषेध व्यक्त केला. भर पावसात या मंडळींनी वृक्षतोडीबद्दल निषेध व्यक्त करीत चिपको आंदोलन करण्याचा इशारा दिला. वृक्षतोड न करता विकासकामे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विकासाला आमचा विरोध नाही, पण पर्यावरणाची हानी करणारा अतिरेकी विकास आम्हाला नको, असे मत यावेळी बहार नेचरचे संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केले.

आजच्या आंदोलनात चेतना विकास, निसर्ग सेवा समिती, नई तालीम, आंनद निकेतन, मगन संग्रहालय, ग्रामसेवा मंडळ या गांधीवादी संस्थांसोबतच सुषमा शर्मा, डॉ. विठ्ठल साळवे, मालती देशमुख, डॉ. आलोक बंग, निरंजना मारू, दिलीप विरखेडे, अ‍ॅड. पूजा जाधव, प्रा. किरण जाजू, भाग्यश्री उगले, अफरोज शेख, कस्तूब ताकसांडे, विलास ठेंबरे, हर्षा पांडे, चेतन परळीकर, अनिल परसोले, राजश्री चौधरी, डॉ. विभा गुप्ता, डॉ. सचिन पावडे, अतुल शर्मा, मुरलीधर बेलखोडे, डॉ. प्रणाली कोठेकर, राहूल तेलरांधे, सचिन घोडे, अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे व अन्य पर्यावरणप्रेमी मान्यवर सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 6:50 pm

Web Title: environmentalists blew the trumpet of agitation against tree felling on revolution day today msr 87
Next Stories
1 शिवसेनेने आंदोलन जरूर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही? याचं उत्तर द्यावं : शेलार
2 “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही”; राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपावर टीका
3 नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, गुलाबराव पाटील यांची बोचरी टीका
Just Now!
X