राज्यात करोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशांनंतर २२ एप्रिल पासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.

 

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
The State Government has provided funds to the Municipal Corporation for constructing boundary walls along the drains and streams to control the flood situation Pune
ओढ्यांलगत सीमाभिंती बांधण्याचा प्रश्न मार्गी; राज्य सरकारकडून महापालिकेला २०० कोटींचा निधी
dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
water supply cut in mumbai
मुंबईवर पाणीकपातीची वेळ का?

कसा काढाल ई पास?

याआधी देखील ई-पास काढण्यासाठी अशाच प्रकारे संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला होता. त्यावर ई-पास काढण्यासाठी अर्ज करण्यासाठी आणि पास मंजूर झाल्यास तो डाऊनलोड करण्यासाठी असे दोन पर्याय देण्यात येतात.

१. आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. संदर्भासाठी फोटो पाहा.

How to get E pass in maharashtra

२. या पेजवर दोन पर्याय असतील. त्यामध्ये जर तुम्ही नव्याने ई-पास करण्यासाठी अर्ज करत असाल, तर Apply For Pass Here या टॅबवर क्लिक करा.

३. पुढच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? अशी विचारणा केली जाईल. आपल्याला हवा तो पर्याय त्यातून निवडा. इथे फक्त आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास नाही पर्याय निवडा.

How to get E pass in maharashtra

मात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास हो पर्याय निवडा. इथे तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या निवडावी लागणार आहे.

How to get e pass in maharashtra

४. पुढच्या पेजवर तुम्हाला प्रवासासंदर्भात सर्व माहिती भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, प्रवासाची तारीख, मोबाईल क्रमांक, प्रवासाचं कारण, वाहनाचा प्रकार, वाहनाचा क्रमांक, सध्याचा पत्ता, इमेल आयडी, प्रवास सुरू होण्याचं ठिकाण, प्रवासाचं शेवटचं ठिकाण, तुम्ही सध्या कंटेनमेंट झोनमध्ये आहात का? परतीचा प्रवास यासंदर्भातली माहिती भरावी लागणार आहे.

How to get e pass in maharashtra

या फॉर्मच्या खालीच तुमचा फोटो जोडण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. त्यासोबतच आधार कार्ड, वैद्यकीय कागदपत्रे (उपचारांसाठी जात असाल तर) अशी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यासोबत डॉक्टरकडून घेतलेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील लिंक देण्यात आली आहे.

How to get e pass in maharashtra

वरील सर्व माहिती भरल्यानंतर खाली Submit टॅबवर क्लिक केल्यास तुमचा ई पाससाठीचा अर्ज जमा होईल. त्याचा एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल.

How to get e pass in maharashtra

५. आपला अर्ज मंजू झाला किंवा नाकारला गेला याचा तपशील पाहण्यासाठी पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला माहिती मिळवता येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला टोकन आयडी टाकून अर्जाचा तपशील पाहाता येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास मिळालेला पास डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात येईल. तिथून अर्ज डाऊनलोड करून घेता येईल.

How to get e pass in maharashtra

दरम्यान, ऑनलाईन प्रक्रियेसोबतच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील प्रवासासाठी पास मिळवता येऊ शकतो असं देखील पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पासचा वापर केवळ आपातकालीन परिस्थितीतच करावा, असं देखील सांगण्यात आलं आहे.