02 March 2021

News Flash

“भारतात समान नागरी कायदा आणण्याची नितांत गरज”

पद्मश्री पुरस्कार विजेते सय्यदभाई यांनी व्यक्त केलं मत

धवल कुलकर्णी 

भारतात समान नागरी कायदा अस्तित्वात येण्याची नितांत गरज आहे. देशात कायद्याचं राज्य हवं धर्माचं नाही. तोंडी एकतर्फी तलाकवर सराकरने घातलेली बंदी हे समान नागरी कायद्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया पद्मश्री सय्यदभाई यांनी दिली.  गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये सय्यद भाई यांनाा पद्मश्रीने गौरवण्यात आलं आहे.

सय्यद महबूब शहा कादरी उर्फ सय्यदभाई हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कृतीशील कार्यकर्ते आणि माजी अध्यक्ष. “माणसाचं माणूसपण जिवंत राहिलं पाहिजे. त्याने मानवी मूल्यं जपावीत आणि स्त्रयिांनाही पुरुषांसारखे समान अधिकार मिळावेत.” अशी अपेक्षाही सय्यदभाई यांनी व्यक्त केलं. सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि NPR बाबत सुरू असलेल्या मोर्चा आणि इतर आंदोलनाबाबत विचारले असता “याबाबत मुस्लिम समाजाने भीती व्यक्त केली आहे हे मान्य आहे परंतु CAA आणि एनआरसी बाबत अभ्यास करावा लागेल” असे सय्यद भाई म्हणाले.

एकेकाळी अहल-ए-हदिस पंथाचे कट्टर अनुयायी असलेल्या सय्यदभाईंच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. १९९५ च्या दरम्यान त्यांच्या बहिणीला तिच्या नवऱ्याने तोंडी एक तर्फी तलाक दिला. घडलेल्या प्रकाराने पूर्णपणे हादरलेल्या सय्यदभाईंनी अनेक मुस्लिम धर्मगुरु आणि इतर मंडळींशी संपर्क साधला पण त्यांनी यात ही धर्माची बाब आहे असं सांगून हस्तक्षेप करायला नकार दिला. त्यानंतर मार्गदर्शनासाठी त्यांची भेट झाली ती हमीद दलवाई सोबत आणि त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले.

आज चर्चेत असलेला तोंडी एकतर्फी तलाक मुद्द्याला पहिल्यांदा तोंड फोडलं ते दलवाईंनी. १८ एप्रिल १९६६ रोजी हमीद दलवाईंनी तलाक पीडित मुसलमान महिलांच्या मोर्चा मंत्रालयावर आयोजित केला आणि मार्च १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. या प्रवासामध्ये हमीद दलवाईंसोबत खांद्याला-खांदा जाऊन सय्यदभाई सुद्धा उभे होते. मात्र हमीद दलवाई यांच अकाली निधन झालं. १९८० च्या दशकात शाह बानोच्या प्रकरणांमध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाने या महिलेची बाजू लावून धरली. मुस्लिम सत्यशोधक मंडळ हे समान नागरी कायदा, स्त्रियांना समान अधिकार व तोंडी एकतर्फी तलाकवर बंदी या बाबत आग्रही आहे. याबाबत सामाजिक संघर्ष करत असताना आलेल्या बऱ्या-वाईट अनुभव सय्यद भाई नी आपल्या ‘दगडावरची पेरणी’ या आत्मचरित्रात मांडले आहेत.

केंद्र सरकारने तोंडी एकतर्फी तलाक वर बंदी घातल्यानंतर मंडळाने याचे समर्थन केले. २०१७ मध्ये सय्यद भाई आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बहुपत्नीत्व, निकह आणि हलाला अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घालावी अशी मागणी केली होती. सय्यदभाई वयोमानानुसार मंडळाच्या अध्यक्षपदावरून दूर झाले असले आणि त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना वाव दिला असला तरीसुद्धा हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अव्याहतपणे सुरु असलेल्या दगडावरच्या पेरणीचा सन्मान आहे…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 3:29 pm

Web Title: equal citizenship law for india says padmshri winner sayyadbhai scj 81
Next Stories
1 …..वेगळं काही लिहून दिलेलं नाही, अशोक चव्हाणांना शिवसेनेचं उत्तर
2 तुमच्या जिल्ह्यात १० रुपयांत जेवण कुठं मिळणार?
3 उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोकं समाधानी, सर्व्हेक्षणातील निष्कर्ष
Just Now!
X