News Flash

अलिबागच्या कारागृहातून कैद्यांचे पलायन; एक ताब्यात, दुसरा फरार

अलिबाग पोलिसांची शहरात नाकाबंदी

संग्रहित छायाचित्र

बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या दोन कैद्यांनी कारागृहाच्या दगडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याला पकडण्यात यश आले आहे तर दुसरा कैदी पळून जाण्यात यशस्वी झाला. फरार कैद्याला पकडण्यासाठी अलिबाग शहराच्या सीमेवर बंदोबस्त ठेवला असून शहरात ठिकठिकाणी पोलीस शोध घेत आहेत.

अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्याची ही साधारण पाचवी ते सहावी घटना आहे. अलिबाग तालुक्यात आणि कोलाडमध्ये घडलेल्या बलात्काराच्या आरोपाखालील दोन कैद्यांना अलिबाग शहरातील कारागृहात ठेवण्यात आले होते. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या दोन कैद्यांनी कारागृह पोलिसांची नजर चुकवून दगडी भिंतीवरून खाली उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांची धावपळ उडाली, अलिबाग पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात यश आले आहे. तर कोलाड गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.

कारागृहातून कैदी फरार झाल्याची खबर मिळताच अलिबाग पोलिसांनी शहरातील सर्व सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 6:35 pm

Web Title: escape of prisoners from alibag prison one in custody the other absconding
Next Stories
1 नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका
2 वर्धा : कापूस खरेदी संथगतीने सुरू; शेतकऱ्यांनी केलं ‘कापूस जाळा आंदोलन’
3 “देवेंद्र भौ आमचं खरंच चुकलं”, शिवसेनेचा टोला
Just Now!
X