News Flash

18 वर्षांनी फेसबुकवर भेटला प्रियकर, भेटायला गेली असता केला बलात्कार

काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून एकमेकांच्या संपर्कात आले होते

प्रतिकात्मक छायाचित्र

18 वर्षांनी फेसबुकवर भेटलेल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने बलात्कार करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली होती. महिलेला ब्लॅकमेल करत एक लाख रुपयांची मागणीही आरोपीने केली होती. चिंचवड येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आले होते. सविस्तर माहिती अशी की, आरोपीचे आणि पीडित महिलेचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यानंतर महिला उल्हासनगरला स्थायिक झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क नव्हता. काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून संपर्कात आले होते. दोघांनी एकमेकांचा नंबर घेत पुन्हा भेटण्यास सुरुवात केली.

आरोपीने महिलेला चिंचवड येथे आणून गुंगीचे औषध देत इच्छेविरोधात शारिरीक संबंध ठेवत बलात्कार केला. आरोपीने फोटो काढले तसंच व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला होता. हे फोटो आणि व्हिडीओ भावाला आणि पतीला दाखवेन अशी धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती महिलेने तक्रारीत दिली आहे. तसंच पैसे न दिल्यास व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही आरोपीने दिली होती. महिलेने अखेर चिंचवड पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 1:11 pm

Web Title: ex boyfriend rapes woman met after 18 years in chinchwad
Next Stories
1 मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
2 वाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्हास पवार यांचा आरोप
3 मेजर शशीधरन माफ करा, जवानांचे बलिदान व्यर्थच जात आहे – उद्धव ठाकरे
Just Now!
X