X
X

मटका किंग रतन खत्री यांचे निधन

READ IN APP

८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मटका किंग रतन खत्री यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झाले आहे. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ८८ वर्षांचे होते. रतन खत्री गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत रतन खत्री आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. ६० च्या दशकात खत्री यांनी कल्याणमधून मटक्याच्या धंद्याला सुरूवात केली होती. सुरूवातीला खत्री भगत यांच्या धंद्यात मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. १९६४ मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत: चा रतन मटका धंदा सुरू केला. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढणे इतके प्रसिद्ध झाले की, त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज १ कोटी रुपयांच्या घरात असायची.

22
X